तिरंगा आपल्या देशाच्या हृदयाची स्पंदने दर्शवतो. कारण तो ‘विश्वासाच्या मागा’वर विणला गेला आहे...
येथे हिरवा रंग आहे – जमिनीशी आपले नाते, ज्यावर सर्व जग अवलंबून असते, त्या झाडांशी आपले नाते (हा रंग दर्शवतो), या हिरव्या पृथ्वीवर आपण स्वर्ग उभा केला पाहिजे. जर हे साहस करण्यात आपणास यश हवे असेल, तर आपण सत्य (पांढरा) याचा आधार घेतला पाहिजे. सदाचार (चक्र) आचरणात आणला पाहिजे. आत्मनियंत्रण व त्याग (केशरी) या पद्धती अंगीकारल्या पाहिजेत. हा ध्वज आपल्याला सांगतो, नेहमी दक्ष रहा. नेहमी गतिशील रहा, उन्नती करा.......